माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्या याचिकेवरील आदेश ५ सप्टेंबरला देण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितले.
याचबरोबर, न्या. आर. भानुमती व न्या. ए.एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने या प्रकरणात चिदम्बरम यांना अटकेपासून दिलेल्या अंतरिम संरक्षणाची मुदत येत्या गुरुवापर्यंत वाढवली.
सक्तवसुली संचालनालय (ईडी) न्यायालयापुढे जी कागदपत्रे ठेवू इच्छिते, ती त्यांनी सीलबंद लिफाप्यात आपल्याला सादर करावीत, असेही निर्देश खंडपीठाने त्यांना दिले. ही कागदपत्रे पाहण्याच्या मुद्दय़ावर आपण निर्णय घेऊ असे न्यायालय म्हणाले.
ईडीने दाखल केलेल्या आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आपल्याला अटकपूर्व जामीन नाकारणाऱ्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या २० ऑगस्टच्या आदेशाला चिदम्बरम यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
WebTittle: Chidambarams Decision On September 5 Decided
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.